पिंपरी / चिंचवड

कंपनीची 139 कोटींची फसवणूक ; चार व्यवस्थापकीय संचालकांवर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

चार व्यवस्थापकीय संचालकांनी मिळून कंपनीच्या इतर संचालक, मुख्य कंपनी आणि परचेस हेड यांना कुठलीही माहिती न देता खोटे इनव्हाइस, डोनेशन आणि सीएसआर अंतर्गत मोठमोठ्या रकमा देऊन कंपनीची 139 कोटी रुपयांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2010 ते मे 2020 या कालावधीत एचयुएफ इंडिया प्रा ली या कंपनीत नाणेकरवाडी येथे घडली.

सुनील कुमार गर्ग, निखील अगरवाल, संदीप वाणी, विशाल टमोटीया अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यवस्थापकीय संचालकांची नावे आहेत. याप्रकरणी संदीप जगदीश चौधरी (वय 45, रा. नाणेकरवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवस्थापकीय संचालक आरोपींनी पदाचा गैरवापर करून स्वताच्या फायद्यासाठी कंपनीचे इतर संचालक, जर्मनी येथील मुख्य कंपनी एच यु एफ हल्सबेक अंड फुर्स्ट जीएमबीएच एंड कंपनी केजि बेल्बर्ट यांना व कंपनीचे परचेस हेड श्रीपाद कुलकर्णी आणि त्यांच्या टीमला कोणतीही माहिती दिली नाही. 170 आणि 172 या खोट्या परचेस ऑर्डर सिरीज तयार करून त्याद्वारे वेगवेगळ्या व्हेंडर कडून खोटे इनव्हाइस घेतले. त्यावर कंपनीचा खोटा शिक्का मारला. खोटे गुडस रिसीट नोट्स बनवून इनव्हाइसमधील माल कंपनीत न आणता मेनगेट रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी केला. त्या मालाची बिलाची रक्कम व्हेंडरला कंपनीच्या बँक खात्यातून दिली. वेगवेगळ्या एनजीओला आवश्यक नसताना देखील डोनेशन व सीएसआर द्वारे मोठ्या प्रमाणात रक्कम देऊन व असे इतर गैरव्यवहार करून कंपनीची 139 कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button