breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

चेन्नई एक्सप्रेसमधून तब्बल 1200 सरडे, 279 कासव आणि 230 मासे जप्त; पुणे पोलिसांची कारवाई

पुणे |महाईन्यूज|

पुणे रेल्वे पोलिसांनी एक मोठी कारवाई करत प्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी रेल्वेतून तब्बल 230 कासव आणि 1200 सरडे जप्त केले आहेत तसेच दोन आरोपींना अटक सुद्धा केली आहे.
चेन्नई एक्सप्रेसमध्ये पुणे लोहमार्ग पोलिसांची धडक कारवाई केली आहे.

चेन्नई एक्सप्रेसमधून प्राण्यांची तस्करी करणाऱ्यांना केलं गजाआड केले. आरोपींकडून तब्बल 230 कासव आणि 1200 सरडे जप्त केले. रेल्वेतून प्राण्यांची तस्करी करणारे मोठे रॅकेट लोहमार्ग पोलिसांनी उघडकीस आणले आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेली कासवे ही आफ्रिकन जातीचे आहेत.

चेन्नई एलटीटी एक्सप्रेस गाडीने प्रवास करणाऱ्या दोघा प्रवाशांना अटक करुन त्यांच्याकडून कासव, सरडे, मासे जप्त करण्यात आले आहेत.  चार ट्रॅव्हल्स बॅगेमधून 279 कासव, वेगवेगळ्या जातीचे 1207 सरडे आणि 230 मासे जप्त करण्यात आले. तपासात हे प्राणी परदेशी प्रजातीचे असल्याचं निष्पन्न झाले, या प्राण्यांच्या वाहतुकीसाठी कस्टम विभागाची परवानगी लागते मात्र आरोपींकडे मात्र कोणतही कागदपत्रे नव्हती. आरोपींकडे आवश्यक असलेली कुठलीच कागदपत्रे नसल्याने पुण्यातील लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button