breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

12 वी बोर्ड परीक्षांचा निकाल 10 जूनला जाहीर होणार नाही

प्रत्येक वर्षी HSC बोर्ड परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात येतो. मात्र कोरोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाऊन असल्यानं हायकोर्टाच्या निर्णयानुसार एचएससी बोर्ड परीक्षेचा निकाल येत्या 10 जून 2020 रोजी जाहीर होणार असल्याचं म्हटलं होतं. तर सरकारने विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन निकाल जाहीर करावे असही म्हटले आहे. तर राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गाडकवाड यांनी 12 वी बोर्ड परीक्षांचा निकाल थोडा उशिराने लागणार असल्याचं सांगतीलं असून  येत्या 10 जूनला निकाल जाहीर करण्यात येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे

वर्षा गाडकवाड यांनी 12 वी बोर्ड परीक्षांचा निकाल लागण्याबाबत पुढे असे ही म्हणाल्या आहे की, 10 जूनला निकाल जाहीर करणे शक्य नसून त्यासाठी अजून एका महिन्याचा कालावधी लागू शकतो. लॉकडाऊनमुळे पेपर तपासणीचे काम लांबणीवर पडत आहे. उत्तरपत्रिका पोस्ट ऑफिसमधून जमा केल्यानंतर त्या शिक्षकांकडे तपासणीसाठी पाठवल्या जात आहेत. पेपर तपासणीची ही प्रक्रिया 18 मे पासूनच सुरु झाल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. मात्र निकाल लावण्यासंबंधित विचार करण्यात येत असून जूलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाईल असे ही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

लॉकडाऊनमुळे शिक्षण क्षेत्रातील विविध गोष्टींबाबतच्या प्रक्रिया अडून राहिल्या आहेत. तसेच पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांच्या परिक्षा सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 31 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युनिव्हर्सिटीच्या अंतिम परीक्षा सुद्धा रद्द करुन विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात यावे असे म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button