breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मालाडमध्ये इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू; ७ जण जखमी

मुंबई – बुधवारी मध्यरात्रीपासून मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले. सातत्याने कोसळणाऱ्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मालाड भागात इमारत दुर्घटना घडली आहे. मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री अस्लम शेख घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी त्यांनी मुसळधार पावसामुळे इमारत कोसळल्याची माहिती दिली.

दरम्यान, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, रात्री ११ वाजून १० मिनिटांनी ही दुर्घटना घडली. तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘१७ जखमींना कांदिवलीतील रुग्णालयात आणण्यात आले होते. यामधील ९ जणांचा मृत्यू झाला होता. इतर ८ जणांवर उपचार सुरू होते.’

मुंबईतील मालाड पूर्व भागात मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात ही दुर्घटना घडली. या ठिकाणी एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. यात मृत्यू झालेल्यांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींचा समावेश आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकेने मृतांसह गंभीर जखमींची यादी जाहीर केली आहे.

मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांची यादी
1. साहिल सर्फराज सय्यद (पु) – 9 वर्ष
2. अरिफा शेख – 8 वर्ष
3. अज्ञात (पु) – 40 वर्षे
4. अज्ञात (पु)- 15 वर्षे
5. अज्ञात (स्त्री)- 8 वर्षे
6. अज्ञात (स्त्री) – 3 वर्षे
7. अज्ञात (स्त्री) – 5 वर्षे
8. अज्ञात (स्त्री) – 30 वर्षे
9. अज्ञात (स्त्री) – 50 वर्षे
10. अज्ञात (पु) – 8 वर्षे
11. जॉन इराना- 13 वर्ष

मालाड इमारत दुर्घटनेतील जखमी
१. मरी कुमारी रंगनाथ – वय वर्ष 30
२. धनलक्ष्मी बेबी – वय वर्ष 56 (प्रकृती स्थिर)
३. लीम शेख – वय वर्षे 49 (प्रकृती स्थिर )
४. रिजवाना सय्यद – वय वर्ष 33(प्रकृती स्थिर)
५. सूर्य मनी यादव – वय वर्षे 39 (प्रकृती स्थिर)
६. करीम खान – वय वर्ष 30 (प्रकृती स्थिर)
७. गुलजार अहमद अन्सारी – वय वर्ष 26 (प्रकृती स्थिर)

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button