विश्वचषकासाठी पोर्तुगालचा संघ घोषित

- नानी, एडर, आंद्रे गोमेज, रेनाटो सांचेस आणि एलिसेयू यांना डावलले
लिसबन – फ्रान्समध्ये 2016 साली झालेल्या युरो चषक स्पर्धेचे नाटयमय जेतेपद पटकावणाऱ्या पोर्तुगाल संघातील निम्म्याहून अधिक खेळाडू रशियात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत खेळणार नाहीत. प्रशिक्षक फर्नाडो सांतोस यांनी शुक्रवारी विश्वचषक स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या पोर्तुगाल संघातून अपेक्षित चेहऱ्यांना डच्चू देण्यात आला आहे. यामध्ये आक्रमक नानी आणि युरो चषक स्पर्धेतील विजयी गोल करणारा मध्य आक्रमक एडर यांच्यासह 10 खेळाडूंचा समावेश आहे. त्याऐवजी सांतोस यांनी युवा खेळाडू आंद्रे सिल्व्हा आणि गोंसालो ग्युडेस यांची निवड केली आहे.
युरो विजेतेपद मिळविलेल्या संघातील चौघांना वगळून पोर्तुगालने येत्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी संघ जाहीर केला. त्यामुळे पुन्हा एकदा ख्रिस्तियानो रोनाल्डोवर संघाचा भार पडला आहे. त्यातच त्यांच्या गटात त्यांना स्पेनचे तगडे आव्हान असणार आहे.
दोन वर्षांपूर्वीच्या युरो करंडक विजेत्या संघात समावेश असलेल्या काही खेळाडूंना संघातून वगळणे कठीण आहे; परंतु त्याशिवाय पर्याय नव्हता, असे पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सॅंतोस यांनी सांगितले. वगळलेल्या या चार प्रमुख खेळाडूंमध्ये लाझिओ संघाचा नानी, बार्सिलोनातून खेळणारा आंद्रे गोमेस, बायर्न म्युनिकचा रेनाटो सॅंचेझ आणि युरो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्सविरुद्ध जादा डावात गोल करणारा स्ट्रायकर एडगर यांचा समावेश आहे.
त्या अंतिम सामन्यात रोनाल्डो जखमी झाल्यामुळे काही वेळानंतर खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत इतर खेळाडूंनी पोर्तुगालची मदार सांभाळली होती. युरो स्पर्धेत विजेतेपदाच्या प्रवासात असलेल्या काही खेळाडूंना वगळणे हे दुःखद आहे. पोर्तुगालचा फुटबॉल इतिहास लिहिताना त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे; पण पुढील आव्हानांसाठी सर्वोत्तम संघ तयार करण्यासाठी मला काही इतर पर्याय पसंत करावे लागले, असे सॅंतोस यांनी सांगितले.
मॅंचेस्टर युनायटेडचा माजी खेळाडू असलेला नानी हा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लुईस फिगो यांच्यानंतर पोर्तुगालचा सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू आहे. गतवर्षीच्या कॉन्फडरेशन करंडक स्पर्धेनंतर तो पोर्तुगालकडून खेळलेला नाही. विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या 23 खेळाडूंच्या संघात इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेत खेळलेल्या चार खेळाडूंचा समावेश आहे. त्यामध्ये विजेत्या मॅंचेस्टर सिटीच्या बर्नांडो सिल्वाचा समावेश आहे.
पोर्तुगालचा संघ
गोलरक्षक : अँटोनी लोपेस, बेटो, रुई पॅट्रीसियो
बचावपटू : ब्रुनो ऍल्व्हेस, स्रेडीक सोआरेस, जोस फोंटे, मारिया रुई, पेपे, राफेल ग्युरेरो, रिकाडरे परेरा, रुबेन डायस
मध्यरक्षक : ऍड्रीयन सिल्व्हा, ब्रुनो फर्नाडेस, जो मारियो, जो मॉटिन्हो, मॅन्यूएल फर्नाडेस, विलियम काव्र्हाल्हो;
आक्रमण : आंद्रे सिल्व्हा, ब्रनाडरे सिल्व्हा, ख्रिस्तियानो रोनाल्डो, जेल्सन मार्टिन्स, गोंसालो ग्युडेस, रिकाडरे क्युरेस्मा.