breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारणराष्ट्रिय

यंदा सरासरीच्या १०१ टक्के पाऊस; दुसऱ्या टप्प्यातील अंदाज जाहीर

पुणे  |

देशात जून ते सप्टेंबर या दरम्यान सरासरीच्या १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण चांगले असेल, तर मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने एप्रिलमध्ये जाहीर के लेल्या जून ते सप्टेंबर या कालावधीतील मोसमी पावसाच्या पहिल्या अंदाजातही सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता.

यंदा मोसमी पावसाचा केरळमध्ये दाखल होण्याचा प्रवास काहीसा लांबल्याचे चित्र आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मोसमी पावसाचा दुसऱ्या टप्प्यातील अंदाज मंगळवारी जाहीर केला. गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या सुमारास तीव्र असलेला ला निना हा घटक २०२१च्या सुरुवातीपासून क्षीण होऊ लागला आहे. तसेच प्रशांत महासागरातील स्थिती स्थिर राहील. १९६१ ते २०१० या काळात देशात दीर्घकालीन सरासरीनुसार ८८ सेंटिमीटर पाऊस झाला आहे. त्या आधारावर पावसाचा अंदाज काढण्यात आला आहे.

देशातील स्थिती…

दक्षिणेच्या राज्यातील काही भागांमध्ये, उत्तरेच्या आणि ईशान्येकडील राज्यांतील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. मोसमी पावसाचे देशभरातील वितरण चांगले असेल. त्यामुळे देशभरातील बहुतांश भागामध्ये सरासरीइतका किं वा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाने नमूद के ले आहे.

भाकीत…

यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या १०१ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यात चार टक्क्यांपर्यंत वाढ-घट होऊ शकते.

राज्यात काय?किती?

राज्यात सरासरीइतका किं वा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज असला, तरी मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. खरीप हंगामातील पिकांच्या दृष्टीने पावसाचा अंदाज सकारात्मक आहे.

पाऊसभान…

अरबी समुद्रातील चक्रीय स्थिती मोसमी वाऱ्यांसाठी अडथळा ठरत होती. त्यामुळे मोसमी पावसाचे केरळमधील आगमन लांबले आहे. मोसमी वाऱ्यांसाठी अडथळा ठरलेली परिस्थिती निवळून आता पोषक वातावरण निर्माण झाले असून, ३ जूनपर्यंत मोसमी वारे के रळमध्ये दाखल होणार आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button