breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माथेरानचे १० नगरसेवक शिवसेनेतून भाजपात गेले अन् अपात्र ठरले!

रायगड – माथेरान नगरपरिषदेचे शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या याच पक्षांतराच्या विरोधात माथेरान नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी जिल्हाधिकारी रायगड याच्याकडे पक्षांतर बंदी कायद्यानुसार तक्रार दाखल केली होती.अखेर या सर्व नगरसेवकांना जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी अपात्र ठरवले.

या प्रकरणाबाबत रायगड जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी सुरू होती.२७ ऑक्टोबर रोजी अखेरची सुनावणी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या समोर झाली. त्यानंतर निर्णय जिल्हाधिकारी यांनी राखून ठेवला होता.अखेर काल नऊ नगरसेवकांसह एक स्वीकृत अशा १०भाजपवासी नगरसेवकांना जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी अपात्र ठरविले. तसा आदेश सर्व नगरसेवक यांना पोस्टाने कळविला आहे.भाजपात गेलेल्या या नगरसेवकांना अपात्र ठरविल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी कोल्हापूर येथे पक्षप्रवेश केला होता.अपात्र ठरलेल्या नगरसेवकांमध्ये उपनगराध्यक्ष आकाश चौधरी,राकेश चौधरी,संदीप कदम,महिला बालकल्याण समिती सभापती सोनम दाभेकर, शिक्षण समिती सभापती प्रतिमा घावरे, रुपाली आरवाडे, सुषमा जाधव,प्रियांका कदम,ज्योती सोनावळे,स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव यांचा समावेश आहे .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button