breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात गेल्या २४ तासांत १ लाख १४ हजार ४६० नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

नवी दिल्ली – देशात गेल्या २४ तासांत १ लाख १४ हजार ४६० नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कालपेक्षा आज ६ हजारांनी रुग्णसंख्या घटली असून कोरोनाबळींंचाही आकडा घटला आहे. गेल्या २४ तासांत २ हजार ६७७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. कालच्या दिवसात देशात 1 लाख 89 हजार 232 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 88 लाख 9 हजार 339 वर गेला आहे. देशात 2 कोटी 69 लाख 84 हजार 781 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 46 हजार 759 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 14 लाख 77 हजार 799 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 23 कोटी 13 लाख 22 हजार 417 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 1,14,460

देशात 24 तासात डिस्चार्ज – 1,89,232

देशात 24 तासात मृत्यू – 2677

एकूण रूग्ण – 2,88,09,339

एकूण डिस्चार्ज –2,69,84,781

एकूण मृत्यू – 3,46,759

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 14,77,799

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 23,13,22,417

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button