breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडीराष्ट्रिय

जगभरात 1 तास इंटरनेट सेवा बंद; नेटकऱ्यांची तारंबळ

नवी दिल्ली – काही दिवसांपुर्वी जगप्रसिद्ध अॅप फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हाॅट्सअॅप काही काळासाठी बंद झाले होते. त्यानंतर सर्वत्र एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर आता सोशल मीडिया नाही तर संपुर्ण इंटरनेटच काही काळासाठी बंद झालं होतं. जगभरात इंटरनेट ठप्प झाल्यानंतर एकच गदारोळ पाहायला मिळाला. मोठमोठ्या कंपन्यांची मोठी तारांबळ उडाली.

मंगळवारी दुपारी साडेतीन ते साडेचार या दरम्यान हा इंटरनेट बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. या इंटरनेटच्या तांत्रिक दोषामुळे अनेक वृत्तपत्र तसेच सोशल मीडिया साईट्स यासह अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या वेबसाईटसलाही फटका बसला. इतकंच नाही तर ब्रिटची सरकारी वेबसाईटसह फायनान्शियल टाईम्स, द गार्डियन आणि न्यूयॉर्क टाईम्सची वेबसाईट देखील बंद पडली होती. हे इंटरनेट बंद होण्यासाठी क्लाउड कंप्युटिंग प्रोव्हायडर कंपनी ‘फास्टली’ जबाबदार असल्याचं समोर आलं आहे.

आमच्या ग्लोबल कंटेंट डिलिव्हरी नेटवर्कमध्ये एक अपडेशन करत असताना काही तांत्रिक बिघाड झाला होता. आम्हाला एका सर्विस कॉन्फिगरेशनची माहिती मिळाली आहे. त्यामुळेच जागतिक पातळीवर आमच्या पीओपीमध्ये अडथळे आले होते. त्यामुळे जवळपास एक तास इंटरनेट सेवा ठप्प होती. त्यानंतर जगभरातील वेबसाईटस पुन्हा सुरुळीत होऊ शकल्या आहेत, अशी माहिती फास्टलीने दिली आहे.

दरम्यान, काही ठिकाणी ही सेवा पुर्णपणे बंद झाली होती, तर काही ठिकाणी इंटरनेट स्पीड खूपच कमी होता. इंटरनेट आता माणसाच्या मुलभूत गरजेचा एक भाग बनला आहे. कोरोनाकाळात याच इंटरनेटमुळे अनेकांची कामं चालू राहिली. त्यामुळे आता इंटरनेट काही मिनिटांसाठी जरी बंद झालं तरी लाखो करोडोचं नुकसान होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button