breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

खात्यात अचानक जमा झाले १ कोटी रुपये; मग काय गाडी आणि सोनं केलं खरेदी, पण…!

नवी दिल्ली |

सध्या देशभरात ऑनलाइन माध्यमातून व्यवहार करण्याचं प्रमाण वाढलं आहे. ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी वेगवेगळे अ‍ॅप आहेत. या माध्यमातून देवाणघेवाण केली जात आहे. मात्र ऑनलाइन व्यवहार करताना अनेकदा चुकीच्या खात्यात पैसे गेल्याचं अनेकांना अनुभव आला असेल. मात्र खात्यात जर चुकून कुणी १ कोटी रुपये ट्रान्सफर केले तर काय?. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये बँकेच्या तांत्रिक बिघाडमुळे एका तरुणाच्या खात्यात थोडीथोडकी नव्हे तर १ कोटींची रक्कम जमा झाली. मग काय तरूणाला ही बाब कळताच त्याने उधळपट्टी सुरु केली. त्याचा खर्च आणि थाटमाट पाहून शेजाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

१७ डिसेंबर २०२१ या दिवशी लखनऊच्या एका पेट्रोल पंपावर काम करणारा करन शर्मा खरेदी करण्यासाठी गेला होता. त्याच्या खात्यात १९८३ रुपये होते. डेबिट कार्डने खरेदी केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्या खात्यात १ कोटींची रक्कम आहे. इतक्या मोठ्या रक्कमेचा आकडा पाहून त्याची बोबडी वळली. मग काय पैशांची लॉटरी लागली असं समजून पाच दिवसात १५.७१ लाखांची एसयूव्ही, २२.४७ लाखांचे सोन्याचे दागिने, ५ लाखांचा मोबाईल आणि दीड लाखांची बाइक खरेदी केली. पाच दिवसात त्याने ७६.२ लाखांची खरेदी केली.

इतक्या मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांचे धाबे दणादणले. त्यांनी लगेचच करन शर्माला बँकेत बोलावलं. मात्र तो काही बँकेत गेला नाही. करनचं डेबिड कार्ड तांत्रिक बिघाडामुळे बँकेच्या सर्व्हरशी लिंक झालं होतं. त्यामुळे बँकेच्या खात्यातून पैसे जात होते. यासंदर्भात बँक मॅनेजरने करनशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने उत्तर दिलं नाही. त्यानंतर बँकेने २४ डिसेंबरला पोलिसात ७६ लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणी करन आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. यात बँकेचे कर्मचाऱ्यांचा सहभाग तर नाही ना? याचा तपासही पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button