breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रियव्यापार

मे महिन्यात १.०२ लाख कोटी ‘जीएसटी’ची वसुली!

नवी दिल्ली |

मे महिन्यात सरकारला १.०२ लाख कोटींचा जीएसटी मिळाला आहे. एप्रिल महिन्यात १ लाख ४१ हजार ३८४ लाख कोटींचा जीएसटी मिळाला होता. देशात जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी आहे. सलग आठव्या महिन्यात याची वसुली १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिली आहे. अर्थमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ग्रॉस जीएसटी रेवेन्यू कलेक्शन १,०२,७०९ कोटी रुपये आहे. यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा म्हणजे CGST १७ हजार ५९२ कोटी रुपये, तर राज्यांचा हिस्सा म्हणजे SGST २२ हजार ६५३ कोटी रुपये राहिला आहे. तर, IGST ५३ हजार १९९ कोटी रुपये आहे.

सेसच्या रूपात ९ हजार २६५ कोटी रुपये मिळाले आहेत. यामध्ये ८६८ कोटी रुपये वस्तूंची आयातीतून मिळाले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडल्याचं दिसून येत आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२०-२१ या वर्षातील जीडीपी आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार जीडीपीत ७.३ टक्क्यांची घट दिसून आली आहे. चार दशकातील सर्वात मोठी घट असल्याची नोंद झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही घट ४ टक्के होती. यापूर्वी १९७९-८०मध्ये ग्रोथ रेट -५.३ टक्के नोंदवला गेला होता. तेव्हा देशात दुष्काळजन्य स्थिती होती. तसेच कच्च्या तेलाचे भावही दुप्पट झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button