breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीतील भाजपाचे प्रभारी बाळा भेगडे करोना पॉझिटिव्ह

पिंपरी । प्रतिनिधी

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा संपूर्ण प्रचार करून मतदान झाल्यावर भारतीय जनता पक्षाचे सोलापूर प्रभारी, माजी राज्यमंत्री आणि मावळचे संजय ऊर्फ बाळा भेगडे यांना कोरोनाने शनिवारी (ता. १७) गाठले. मात्र, त्यांची प्रक्रुती ठणठणीत असून ते होम आयसोलेशनमध्ये आहेत.

भेगडे १६ दिवसांपासून पंढरपूरात तळ ठोकून होते. ते तिकडे असताना इकडे त्यांच्या सख्या मावशींचे कोरोनाने निधन झाले. गुढीपाडवा सण झाला. तरी, प्रभारी आणि प्रचाराची जबाबदारी असल्याने ते इकडे घरी आले नाही. शनिवारी मतदान सुरू झाले व ते घरी तळेगावला आले. सायंकाळी त्यांनी स्वतः फेसबुकवर पोस्ट टाकून ही माहिती दिली. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनीही सावधगिरीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी करण्याचे आवाहन भेगडे यांनी केले आहे. त्यांच्या चालकाला प्रथम कोरोना झाला. म्हणून भेगडेंनी कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. या दौर्यात त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक साजीद शेख यांनाही या साथीची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे ते सुद्धा ही चाचणी करणार आहेत. भाजपचे विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांना प्रचारादरम्यानच कोरोना झाला होता. त्यावेळी त्यांच्या संपर्कात तेथे प्रचारासाठी गेलेले भाजपचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेश लांडगे यांनाही टेस्ट करुन घ्यावी लागली होती. पण, ती निगेटिव्ह आल्याने त्यांनी आपला प्रचार पूर्ण केला होता. महेश लांडगे यांना अगोदरच कोरोना होऊन गेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button