breaking-newsराष्ट्रिय

८४ ची दंगल घडून गेली म्हणणाऱ्या सॅम पित्रोडांनी पोस्ट केला सुवर्णमंदिरातला फोटो

१९८४ च्या दंगलीचं काय घेऊन बसलात? ही दंगल तर घडून गेली मोदींनी मागच्या पाच वर्षात काय केलं ते सांगा. असं म्हणणारे सॅम पित्रोडा यांनी सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचे आणि या मंदिराबाहेरचे फोटो ट्विट केले आहेत. काँग्रेस नेते सॅम पित्रोडा यांना १९८४ च्या दंगलीबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हटले दंगलीचं काय घेऊन बसलात? ती घडून गेली. या वक्तव्यावरून भाजपा नेते त्यांच्यावर तुटून पडले आहेत. हा वाद पेटलेला असतानाच आज सकाळी सॅम पित्रोडा यांनी त्यांचे गोल्डन टेम्पल अर्थात सुवर्ण मंदिराबाहेरचे फोटो ट्विट केले आहेत.

View image on TwitterView image on Twitter

Sam Pitroda

@sampitroda

Visit to Golden Temple was a divine life time experience and learning on the history of this great religion.

311 people are talking about this

Sam Pitroda

@sampitroda

Blessings at Golden temple on May 8th 2019.

211 people are talking about this

अमृतसरमधलं सुवर्ण मंदिर आणि त्या मंदिराला ८ मे रोजी दिलेली भेट हा एक पवित्र अनुभव होता असं सॅम पित्रोडा यांनी ट्विटच्या पोस्टवर म्हटलं आहे. ८ मे रोजी त्यांनी जालियनवाला बाग येथील स्मारकाला भेट दिल्याचे फोटो ट्विट केले होते. मात्र शुक्रवारी त्यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला भेट दिल्याचे फोटो ट्विट केले आहेत.

नेमकं काय म्हटले होते सॅम पित्रोडा?
१९८४ च्या दंगलीचं आता काय घेऊन बसलात? मोदींनी मागच्या पाच वर्षात काय केलं ते सांगावं. ८४ ची दंगल झाली, घडून गेली. त्याबद्दल आत्ता चर्चा करून काय होणार आहे? मोदींना रोजगार निर्मितीसाठी जनतेने निवडून दिलं होतं. पाच वर्षात किती रोजगार निर्माण झाले? मोदी म्हटले होते आम्ही सत्तेवर आल्यास देशातली २०० शहरं स्मार्ट सिटी होतील. किती शहरं स्मार्ट झाली? कुठे आहे विकास? हे प्रश्न सॅम पित्रोडा यांनी उपस्थित केले होते.

सॅम पित्रोडा यांच्या या वक्तव्यानंतर भाजपा नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. काँग्रेस नेते सॅम पित्रोडा शीख विरोधी दंगल घडून गेली, झाली.. असं बेजबाबदारपणे कसं विचारू शकतात? असा प्रश्न भाजपा नेत्यांनी विचारला आहे. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर सॅम पित्रोडा यांनी मात्र सुवर्ण मंदिराला भेट दिल्याचे फोटो पोस्ट केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button