breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

५० लाखांचा बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त

औरंगाबाद |महाईन्यूज|

औरंगाबादमध्ये बनावट सॅनिटायझरचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. औरंगाबादच्या वाळूज परिसरातील युरोलाईफ हेल्थ केअर कंपनीवर कारवाई करत साठा जप्त करण्यात आला आहे. जवळपास ५० लाखांचे बनावट सॅनिटाझर जप्त करण्यात आले आहे.

युरोलाईफ हेल्थ केअर कंपनी सॅनिटायझरवरील एक्सपायरी डेट आणि किंमत बदलून नागरिकांची फसवणूक करत होते. अन्न व औषध प्रशासनाला याबाबत माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे धाड टाकत त्यांनी बनावट सॅनिटायझर जप्त केले आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या कंपनीविरोधात कारवाई केली.

झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना विषाणूमुळे जगभरात भितीचे वातावरण आहे. या विषाणूने महाराष्ट्रात देखील शिरकाव केला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे ३७ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, औरंगाबादमध्ये एका शिक्षिकेला कोरोनाची लागण झाली आहे. तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे. या शिक्षिकेने रशिया आणि कझाकिस्तान येथे प्रवास केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button