breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

२६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला ५ वर्षांची शिक्षा

लाहोर | महाईन्यूज

२६/११ मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि बंदी घातलेल्या जमात-उद-दावा या संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तान कोर्टाने टेरर फंडिंग प्रकरणी दोषी ठरवत आज ५ वर्षांची शिक्षा ठोठावलेली आहे.

सईदला लाहोर येथून अटक करण्यात आली होती. पाकिस्तानने मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात उद दावा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद व त्याच्या 12 निकटवर्तीयांविरोधात चॅरिटीच्या माध्यमातून संपत्ती जमा करुन त्याचा वापर दहशतवादी कृत्यासाठी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र, मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हाफिज सईदवर कारवाई करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानवर दबाव टाकला होता. तसेच, काही महिन्यांपूर्वी त्याला संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्यामुळे हाफिज सईदवरील या कारवाईमुळे भारताला मोठे यश मिळाले.

हाफिज सईद याला बुधवारी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागाने (सीटीडी) तेथील पंजाब प्रांतातून जुलै २०१८ला अटक केली. दहशतवादविरोधी न्यायालयासमोर एका खटल्यासाठी हजर होण्याकरिता गुजरनवाला येथून लाहोरला चाललेला असताना त्याला अटक करण्यात आली होती. त्याला कडक सुरक्षाव्यवस्था असलेल्या कोटलखपत तुरुंगात ठेवण्यात आलेले होते. लष्कर ए तोयबा, जमात-उद-दावा, तसेच त्यांच्याशी संबंधित फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन (एफआयएफ) या धर्मादाय संस्थेने केलेल्या दहशतवादी कारवाया, तसेच त्यांना पुरविलेली आर्थिक रसद याची चौकशी पाकिस्तानने करावी, असा दबाव जागतिक समुदायाने आणला होता. त्यापुढे अखेर पाकिस्तान झुकला आहे. अशी कारवाई न झाल्यास पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा इशारा फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) दिला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button