breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

१५० किलो गांजासह २८ लाखाचा मुद्देमाल जप्त; बार्शीच्या तरुणाला अटक

पुणे |महाईन्यूज|

पुणे – सोलापूर महामार्गावर चारचाकी वाहनातून तब्बल १५० किलो गांजासह 28 लाखाचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन सराईताना ताब्यात घेतले. याप्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गांजाची तस्करी  केल्याने सचिन कुमार मिरगणे ( वय. 32 रा सुभाष नगर, बार्शी. जि. सोलापूर) याला ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून 150 किलो गांजा, चारचाकी गाडी असा एकुण 28 लाखांचा मुद्देमाल पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला.  

स्थानिक गुन्हे शाखेला पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी अवैद्य धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आले. या पथकाने गेल्या काही दिवसांपूर्वीही गोपनीय मिळालेल्या बातमी वरून उरुळी कांचन येथे २ सराईतांकडून २८ किलो वजनाचा गांजा तसेच एक चारचाकी वाहन असा एकूण ८ लाख २०हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. 

मिळालेल्‍या माहितीवरून भिगवण पोलिस स्टेशन हद्दीत एक टाटा कंपनीची झेस्ट गाडी येणार असून, त्यामध्ये गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार भादलवाडी हद्दीत सोलापूर- पुणे महामार्गावर अकोला फाट्याजवळ सदर पथकाने सापळा रचून, गाडी ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली असता, गांजा मिळून आला.  ही कारवाई ही पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते बारामती उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर  यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, उप निरीक्षक शिवाजी ननवरे अंमलदार  रविराज कोकरे, अनिल काळे, अभिजित यांच्या पथकाने केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button