breaking-newsआंतरराष्टीय

१२ वर्षाची मुलगी देणार दहावीची परीक्षा

पश्चिम बंगाल माध्यमिक बोर्डाने (WBBSE) एका १२ वर्षाच्या मुलीला दहावीची परीक्षा देण्याची परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे १२ वर्षाच्या या मुलीने आतापर्यंत एकदाही शाळेची पायरी चढली नाही. सैफा खातून असे त्या १२ वर्षाच्या मुलीचे नाव आहे.

‘सैफा खातूनने बाहेरून परीक्षा (फॉर्म नंबर १७) देण्याची पात्रता परीक्षा पास केली आहे. ही परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेण्यात आली होती. गेल्या २० वर्षातील सैफाचे हे पहिलेच प्रकरण आहे,’ असे पश्चिम बंगाल माध्यमिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याणमॉय गांगुली यांनी सांगितले. “दहावीची परीक्षा देण्याचे कमीतकमी वय १४ वर्ष आहे. हावडा येथे राहणाऱ्या सैफा खातूनने पात्रता परीक्षामध्ये ५२ टक्के गुण घेत मुख्य परीक्षासाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे. पात्रता परीक्षाचा निकाल ११ ऑक्टोबर २०१८ रोजी लागला होता,” असेही गांगुली यांनी सांगितले.

‘सैफाचे वडील मोहम्मद ऐनुल यांनी बोर्डाकडे मुलीला परीक्षाला बसू द्यावी अशी विनंती केली होती. असा प्रकार यापूर्वी ९० च्या दशकांमध्ये समोर आला होता,’ अशी माहिती बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

पश्चिम बंगालमध्ये दहावी बोर्ड परीक्षा यावर्षी २,८१९ ठिकाणी घेण्यात येणार आहे. १२ मार्च ते २१ मार्च दरम्यान दहावी परीक्षा होणार आहे. दहा लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत आपले नशीब अजमावणार आहेत. त्यापैकी ६,२१,३६६ मुली आणि ४, ८१, ५५५ मुले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button