breaking-newsमनोरंजन
हॉकीनंतर आता सागरिका खेळणार ‘फुटबॉल’
अभिनेत्री सागरिका घाटगेने ‘चक दे इंडिया’ चित्रपटातून अनेकांची मने जिंकली होती. या चित्रपटातील हॉकी खेळाडूच्या भूमिकेसाठी सागरिकाचे खूप कौतुक झाले होते. आता पुन्हा एकदा ती अशाच एका भूमिकेत प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे.
सागरिका मलिंद उके यांच्या आगामी ‘मॉन्सून फुटबॉल’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची कथा गृहिणींवर आधारित आहे. काही गृहिणी एकत्र येऊन त्यांची एक फुटबॉल टीम तयार करतात, अशी या चित्रपटाची कथा असणार आहे.