breaking-newsक्रिडामुंबई

हैदराबादला नमवत चेन्नई बनले आयपीएल किंग

मुंबई – शेन वॉटसन च्या धमाकेदार नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने 179 धावा करताना सनरायजर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करताना तिसऱ्यांदा आयपीयलचे विजेतेपद मिळवले आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने निर्धारीत 20 षटकांत 6 बाद 178 धावा करत चेन्नईसमोर 179 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना चेन्नईने हे आव्हान 18.3 षटकांत 2 गडी गमावत पुर्ण करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

IndianPremierLeague

@IPL

Final. It’s all over! Chennai Super Kings won by 8 wickets http://bit.ly/IPL2018-60 

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या महेंद्रसिंह धोनीचा विश्वास त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर श्रीवत्स गोस्वामी माघारी परतल्यानंतर, शिखर धवन आणि कर्णधार केन विल्यमसनने काही क्षणांसाठी संघाचा डाव सावरला. या दोन्ही खेळाडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही झाली. मात्र ही जोडी फुटल्यानंतर हैदराबादचे फलंदाज मोठी भागीदारी रचण्यामध्ये अपयशी ठरले. छोटेखानी भागीदाऱ्या रचल्यानंतर हैदराबादचे फलंदाज माघारी परतत राहिले. अखेर तळातल्या युसूफ पठाण आणि कार्लोस ब्रेथवेटने फटकेबाजी करत संघाला 178 धावांपर्यंत मजल मारुन दिली. चेन्नईने हे आव्हान एकोणीसाव्या षटकांतच पुर्ण करत हैदराबादचा एकतर्फी पराभव करत विजेतेपद पटकावले.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना सनरायजर्स हैदराबादने केन विल्यम्सन आणि युसूफ पठाण यांच्या दमदार खेळींच्या जोरावर आयपीएलच्या अंतिम सामन्यात हैदराबादला चेन्नईपुढे 179 धावांचे आव्हान ठेवता आले. केन विल्यम्सनने 36 चेंडूंत 47 धावांची खेळी साकारली. केन बाद झाल्यावर आतापर्यंत फॉर्मात नसलेल्या युसूफ पठाणने धमाकेदार फटकेबाजी केली. पठाणने 25 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 45 धावा केल्या.

Chennai Super Kings

@ChennaiIPL

Rayudu with the winning runs! Chennai Super Kings are the Champions of IPL 2018! 💛🦁

कार्लोस ब्रेथवेटने तीन षटकारांच्या जरावर 11 चेंडूंत 21 धावा करत हैदराबादची धावसंख्या फुगवली. या फलंदाजांच्या जोरावर निर्धारीत 20 षटकांत 6 गडी गमावत 178 धावा करत चेन्नई सुपर किंग्ज समोर विजयासाठी 179 धावांचे आव्हान ठेवले आहे. अखेरच्या षटकांमध्ये ब्रेथवेट आणि पठाणने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर हैदराबादने 178 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईकडून दिपक चहरचा अपवाद वगळता सर्व गोलंदाजांना 1-1 बळी मिळाला आहे.

SunRisers Hyderabad

@SunRisers

Rayudu finishes the match with a boundary as won the match by 8 wickets.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button