breaking-newsक्रिडा

हेरॉइनपेक्षा अफू बरी, कायदेशीर मान्यता द्या – सिद्धू

नवी दिल्ली – गेल्या निवडणुकीत पंजाबमध्ये अवैध ड्रग्सच्या मुद्दावरुन राजकीय वातावरण तापल्याचे दिसून आले होते. त्यातच आता कॉंग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी खळबळजनक विधान केले असून शेती करण्याच्या दृष्टीने हेरॉइनपेक्षा अफू चांगली आहे आणि पंजाबमध्ये अफूला कायदेशीर मान्यता द्यायला हवी अशी धक्कादायक मागणी त्यांनी केली आहे. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, माझे काका खूप अफू खायचे आणि ते दीर्घायुष्य जगले.

अफूची शेती कायदेशीर करण्यासाठी आप नेते धर्मवीर सिंह यांचे पंजाबमध्ये मोठे प्रयत्न सुरु आहेत. यावर बोलताना नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले, धर्मवीर सिंह यांचे प्रयत्न चांगले आहेत. अफूमध्ये अनेक औषधी गुण असतात. माझे काका औषध म्हणून अफूचे सेवन करत होते. तसेच, ते चांगले जीवनही जगले, असे नवज्योत सिंग सिद्धू यावेळी म्हणाले.

पंजाबमध्ये ड्रग्सची मोठ्या प्रमाणात तस्करी झाल्यामुळे तेथील युवक व्यसनाधीन झाला. या ड्रग्सच्या अवैध व्यवसायामुळेच अकाली दल-भाजप सरकारचा 2017मध्ये पराभव झाला होता. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचे सरकार राज्यात ड्रग्जची तस्करी करण्याऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा कायदा करण्याच्या तयारीत आहेत. त्याच बरोबर राज्य सरकारने पोलिसांसमवेत सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना डोपिंग टेस्ट करण्यास बंधनकारक केले आहे. दोन वर्षांपूर्वी ड्रग्जच्या मुद्‌द्‌यावरून कॉंग्रेसने विधानसभेत गदारोळही केला होता. अशा परिस्थिती सिद्धू यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सगळीकडूनच त्यांच्यावर टीका होते आहे. अफूची शेती केल्यास गेल्या काही वर्षांपासून तोट्यात जाणारा पंजाबमधील शेतकऱ्याचा नफा होईल असं मतही त्यांनी व्यक्त केलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button