breaking-newsराष्ट्रिय

हुडा यांच्या विरोधात आरोपपत्र

नवी दिल्ली: हरियानातील पंचकुला येथील काहीं संस्थांसाठी राखीव असलेला प्लॉट त्यांच्याकडून काढून घेऊन तो कॉंग्रेस नेत्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या असोसिएटेड जर्नल्स लि कंपनीला अदा केल्याच्या कारणावरून सीबीआयने त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र हुडा यांच्या विरोधात आज आरोपपत्र दाखल केले. सी-17 हा प्लॉट दुसऱ्या संस्थेला विकण्यात आल्याने सरकारी तिजोरीचे 67 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा दावा सीबीआयने या आरोपपत्रात केला आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये हा खटला दाखल करण्यात आला आहे. 1982 मध्ये हा प्लॉट असोसिएटेड जर्नल्स लि कंपनीला देण्यात आला. त्यावर 1992 पर्यंत कोणतेही बांधकाम करण्यात आले नव्हते किंवा तोपर्यंत त्या जागेचा वापर करण्यात आला नव्हता त्यानंतर हुडा यांनी हा प्लॉट असोसिएटेड जर्नल्स कंपनीकडून काढून घेतला होता. त्यानंतर सन 2005 मध्ये हाच प्लॉट त्याच कंपनीला मुळ भावात देण्यात आला असा सीबीआयचा आरोप आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button