breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

हिवाळी अधिवेशन : भाजपाकडून महाविकास आघाडीच्या चहापानावर बहिष्कार!

मुंबई । प्रतिनिधी

मुंबई येथील उद्यापासून (दि.१४) हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. दोन दिवस होणाऱ्या या अधिवेशनाच्या पूर्वसंधेला महाविकास आघाडीकडून आयोजित चहापानावर भाजपाने बहिष्कार घातला. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण देरेकर उपस्थित होते.

फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे :

  • कोरोनामुळे देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मृत्यू
  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली
  • दिशा कायद्यावर सरकारने स्वविस्तर चर्चा करावी
  • त्यासंदर्भात जॉईंट सलेक्टिव्ह कमिटी तयार करून त्याची माहिती घ्यावी
  • इफेक्टिव्ह कायदा तयार झाला पाहिजे
  • कोविड सेंटरमध्ये, पोलिसांच्या उपस्थितीत बलात्कार, विनयभंग
  • राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय गंभीर
  • राज्याची समाजिक घडी विस्कटतीय
  • मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारच्या भूमिकेमुळे सर्वोच्च न्यायलयात स्थगीत
  • त्यामुळेच मराठा समाज वंचित
  • सरकारमध्ये एकवाक्यता नाही
  • सरकारचे मंत्री, प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह करतात
  • सरकारमधील मंत्री मोर्चे काढतात
  • मंत्र्यांना मोर्चे काढण्याचा अधिकार नसतो
  • त्यांनी कॅबिनेटमध्ये जाऊन ठराव करून घेतला पाहिजे
  • सरकारमधीलच काही लोकं पत्र देऊन वेगळी भूमिका घेतात
  • सरकारची भूमिका नेमकी काय आहे ?
  • यासंदर्भात सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी
  • निसंधिग्ध भूमिका सरकारने घेतली पाहिजे
  • विद्युत देयकांच्या संदर्भात सरकारने घुमजाव केले
  • कोल्हापूरच्या पुरात घर वाहून गेले त्यालाही विद्युत बिल दिलं
  • मेट्रोचं कारशेड कांजूरला नेण्यासंदर्भात कोणताही अभ्यास केला नाही
  • मेट्रो मुंबईकरांना 2024 पर्यंत मिळू शकत नाही
  • राज्यात अघोषित अनिबाणी लागलेली दिसतेय
  • पत्रकार, सामान्य नागरिकांना सरकारकडून जेलमध्ये टाकण्याची धमकी
  • अर्णब गोस्वामीबाबत सुप्रिम कोर्टने दिलेला निकाल आणि कंगणाला उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सरकारला चपराक आहे
  • सत्तेचा अहंकार जेव्हा तयार होतो, त्यानंतर सरकार कसं वागतं ते या सरकारने दाखवून दिलं
  • आम्ही ही प्रवृत्ती चालू देणार नाही
  • जनतेच्या प्रश्नांवर आम्ही संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही
  • सरकार पूर्णपणे अपयशी झालेलं आहे
  • सरकार तुघलकी निर्णय घेतंय
  • सरकारच्या चहापाणाला जाणार नाही
  • अधिवेशन का होऊ शकत नाही
  • वाढदिवस, मेळावे होऊ शकता मग अधिवेशन का नाही
  • मी ईडीचा प्रवक्ता नाही
  • भाजपच्या कार्यकर्त्याने पोस्ट सोशल मीडियावर टाकली की धमकावलं जातंय
  • नाईटलाईफची मागणी जुनीच
  • सरकारमधील तिन्ही पक्ष राजकीय नाट्य रचतात
  • त्यातून समाजात दुफळी निर्माण होत आहे
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button