breaking-newsआंतरराष्टीय

हिरोशिमा आणि नागासाकी दुर्दैवी घटनेला 73 वर्षे पूर्ण

जपानमधील हिरोशिमा या शहरावर ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेकडून अणुबॉम्ब टाकण्यात आला होता. यामध्ये सुमारे लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. आज या दुर्दैवी घटनेला 73 वर्षे पूर्ण होत आहे. पण या घटनेस हिरोशिमा आणि नागासकी शहरातील लोक आजूनही विसरले नाहीत. आजही ती धग आणि त्याबदलच्या कटू आठवणी तेथील लोकांच्या मनात कायम आहेत. या घटनेमुळे जगभरातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

या अणुबाॅम्ब हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी तर झालीच होती पण त्याचबरोबर प्रचंड नुकसानही झाले होते. या हल्ल्यात हिरोशिमामधील 1 लाख 40 हजार तर नागासकीतील 74 हजार लोक मरण पावले होते.

आजच्या दिवशी 1945 साली अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर पहिला अणुबाॅम्ब टाकला होता.  या बाॅम्बची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, 3 लाख वस्ती असलेले हे शहर क्षणार्धात नष्ट झाले होते. यामध्ये 1 लाख 40 हजार नागरिक मरण पावले. एका हल्ल्यातून कुठे शहर सावरत होते तोपर्यत 9 आॅगस्टला नागासकी शहरावर दुसरा अणुबाॅम्ब टाकण्यात आला. यामध्ये 74 हजार नागरिक मरण पावले.

जपान शहरातील हिरोशिमा शहरावर अणुबाॅम्ब टाकण्याच्या या घटनेला आज 73 वर्षे पूर्ण झाली आहेत .यानिमित्त आज शहरात सकाळी एका घंटा वाजवून त्या घटनेचे स्मरण केले. त्याबरोबरच शहराच्या महापौरांनी म्हटले की, जगभरातील वाढता राष्ट्रवाद हा शांततेसाठी धोकादायक ठरत आहे. तसेच संपूर्ण जग हे अणुबाॅम्बविरहीत असले पाहिजे अशी आशा व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button