breaking-newsराष्ट्रिय

हिमाचल प्रदेशचे ऊर्जामंत्री सुखराम चौधरींना कोरोना

सिमला -हिमाचल प्रदेशचे ऊर्जामंत्री सुखराम चौधरी आणि त्यांच्या दोन मुलींना कोरोनाची बाधा झाली आहे. ऊर्जामंत्री सुखराम चौधरी यांना रिपन रुग्णालयात तर त्यांच्या दोन्हीं मुलींना मशोबरा कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या संबंधित मंत्र्यांच्या कुटुंबीयांना आणि सचिवालयातील कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.दरम्यान मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

ऊर्जा मंत्री सुखराम चौधरी यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले , मागील काही दिवसांपासून जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वतः ला आयसोलेट करावे तसेच स्वतः ची कोरोना चाचणी करुन घ्यावी ‘. जवळपास पाच दिवसांपूर्वी सुखराम चौधरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप हे एकत्रपणे पांवटा येथे गेले होते. यावेळी पांवटा साहिबमधील त्यांच्या खाजगी सहाय्यक आणि त्यांच्या मित्राला ट्रूनेट मशीनद्वारे केलेल्या नमुना तपासणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र या दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची खात्री मेडिकल कॉलेजच्या कोविड लॅबमधील तपासणीनंतर झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button