breaking-newsआंतरराष्टीय

हिंसाचार खपवून घेणार नाही- मोदी

सीआयएसएफच्या पन्नासाव्या स्थापना दिनानिमित्त दहशतवादावर प्रहार

भारताला लक्ष्य करणाऱ्या दहशतावाद्यांकडून सुरू असलेला हिंसाचार यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले. उरी व पुलवामा हल्ल्यांचा उल्लेख करून ते म्हणाले,की आता पुरे, फार सहन केले, आम्ही कायम हिंसाचार सहन करीत बसणार नाही.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) पन्नासाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले, की जेव्हा शेजारी देश हा शत्रुत्वाच्या कारवाया करीत असतो, सीमपलीकडून दहशतवादाला उत्तेजन देत असतो, त्याची आमने सामने लढण्याची हिंमत नसते, तेव्हा त्या परिस्थितीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासारखी सर्वच सुरक्षा दले महत्त्वाची ठरत असतात.

जैश ए महंमद संघटनेच्या पाकिस्तानातील दहशतवादी छावणीवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा अप्रत्यक्ष संदर्भ देऊन त्यांनी सांगितले, की काही वेळा सरकारला कठोर व ठोस निर्णय घ्यावे लागतात. औद्योगिक सुरक्षा दल व्यक्तिगत सुरक्षेपेक्षा सामूहिक सुरक्षेचे अवघड काम करीत असून रोज आठ लाख लोक प्रवास करीत असतात व ३० लाख लोक  एखाद्या परिसरात ये-जा करीत असतात त्या परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेचे काम आव्हानात्मक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मेट्रोसह अनेक संस्थांचे रक्षण करण्यात केंद्रीय राखीव औद्योगिक दलाची कामगिरी प्रशंसनीय आहे, तेथे प्रत्येक व्यक्ती अनोळखी असते. तिचे वर्तन वेगळे असते. त्यामुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा करण्यापेक्षाही हे काम अवघड आहे. तुम्ही केवळ दरवाजावर उभे राहत नाही तर देशाच्या विकासात हातभार लावत आहात, असे त्यांनी जवानांना सांगितले. जेव्हा माझ्यासारख्या किंवा इतर महत्त्वाच्या व्यक्ती अभ्यागत असतात तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांचे काम अवघड होते. जेव्हा तुम्ही लोकांची झडती घेता तेव्हा अनेकांना त्याचा राग येतो, ते बघून येईन असे म्हणतात पण तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडत असता. पण देशाची व्हीआयपी संस्कृती तशी आहे. लोकांना सुरक्षादलांचा अभिमान असला पाहिजे व त्यांना सहकार्य केले पाहिजे.  काही वेळा व्हीआयपी संस्कृतीने सुरक्षेत अडथळे येतात, पण मी मात्र शिस्त पाळतो. पद हे शिस्तीच्या आड येता कामा नये. प्रत्येक नागरिकाने शिस्तबद्ध असले पाहिजे, त्यांनी शिस्त पाळली नाही तर कामे अवघड होतात, असे मोदी म्हणाले.

३५ हजार पोलिसांचे बलिदान

सीआयएसएफमध्ये महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व दिले ही प्रशंसनीय बाब असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले,की ज्या आईवडिलांनी मुलींना या सुरक्षा दलात पाठवले त्यांचे मी अभिनंदन करतो. स्वातंत्र्यानंतर ३५००० पोलिसांनी प्राणांचे बलिदान वेगवेगळ्यावेळी दिले आहे, त्यातील ४००० जवान हे निमलष्करी दलांचे आहेत.

भारतीय पथकाचा सिंधू दौरा लांबणीवर

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला असतानाच, सिंधू नदी खोऱ्यातील प्रकल्पांच्या पाहणीसाठी या महिन्यात भारतीय चमूचा पाकिस्तानात होणारा प्रस्तावित दौरा पुढे ढकलण्यात आला असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. २९-३० ऑगस्ट २०१८ दरम्यान लाहोर येथे झालेल्या कायमस्वरूपी सिंधू आयोगाच्या ११५व्या बैठकीत, करारातील अटीनुसार दोन्ही बाजूंनी सिंधू खोऱ्याचा दौरा आयोजित करण्यास दोन्ही आयुक्तांनी मान्यता दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button