breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘हिंदू’कार साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात भोसरीत गुन्हा दाखल

पिंपरी । प्रतिनिधी

ज्येष्ठ लेखक आणि ‘हिंदु’कार भालचंद्र नेमाडे  (bhalchandra nemade)यांच्याविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आली आहे. भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ (hindu jagnyachi samruddha adgal) या पुस्तकात लमाण समाजातील स्त्रियांबद्दल दिलेली माहिती ही भावना दुखावणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी रमेश खेमू राठोड यांनी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकामध्ये लमान समाजाच्या महिला हडप्पा काळापासून पुढे वेश्या व्यवसाय करत असे या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आले आहे.  त्यांचे हे विधान जाती समाज यांच्या द्वेषाची भावना निर्माण करणार आहे, असा आरोप अॅडव्होकेट रमेश राठोड यांनी केला आहे.

रमेश राठोड यांच्या तक्रारीनंतर भोसरी पोलीस स्टेशनमध्ये भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात कलम 500, 505 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, भालचंद्र नेमाडे यांनी लमाण समाजाबद्दल पुरावे द्यावे नाहीतर पुस्तक मागे घ्यावे, अशी मागणीही तक्रारदार रमेश राठोड यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button