breaking-newsमहाराष्ट्रराष्ट्रिय

हिंदुस्थानचे संविधान शिवसेना पोपट समजू शकत नाही, ओवेसींची बुरखा बंदीवर प्रतिक्रिया

शिवसेनेने केलेल्या बुरखा बंदीच्या मागणीवरुन वाद निर्माण झाला आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेनेची बुरखा बंदीची मागणी आक्षेपार्ह असून शिवसेना बकवास करत असल्याचे म्हटले आहे. हिंदुस्थानचे संविधान शिवसेना पोपट समजू शकत नाही अशी टीका त्यांनी केली.

शिवसेना बुरखा बंदीच्या मागणीआडून मुस्लिम विरोधी वातावरण निर्मितीचा प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला. शिवसेनेची ही मागणी म्हणजे अचारसंहितेचे उल्लंघन असून निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे असे ओवेसी म्हणाले.

बुरखा बंदीवर काय म्हटले शिवसेनेने
सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करुन श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस आणि धैर्याचे दर्शन घडवले असून रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार?, असा सवाल उपस्थित करतानाच भारतातही बुरखाबंदी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

श्रीलंकेत भीषण बॉम्बस्फोट झाले असले तरी भारतालाही याचे हादरे बसत आहे. जम्मू आणि कश्मीरलाही दहशतवादाने ग्रासले आहे. श्रीलंका, फ्रान्स आणि ब्रिटनसारखे देश कठोर पावले उचलत असतानाच आपण तशी पावले कधी उचलणार?, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. विद्यमान मोदी सरकारने तिहेरी तलाकविरोधात कायदा आणला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून भारतातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button