breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हिंजवडीमध्ये दोन दुकानांना भीषण आग, मोठे नुकसान

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

हिंजवडीजवळील मारुंजी गावातील ग्रामपंचायतीच्या बाजूला असलेल्या फ्लेवर्स चायनीज व शेजारीच असलेल्या आधेश्वर शिट कव्हर या दोन दुकानांना भीषण आग लागली आहे. शुक्रवारी रात्री दोन वाजता ही घटना घटली. पीआरडीएमए अग्निशामक केंद्रातील जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

पीएमआरडीए अग्निशामक केंद्रातील उपस्थानक अधिकारी विजय महाजन यांनी सांगितले की मारुंजी गावात रात्री दोन वाजता शीट कव्हरच्या दुकानाला आग लागली. ही आग पसरत जाऊन शेजारी असलेल्या चायनीज दुकानापर्यंत गेली. मात्र अग्निशामक केंद्रातील जवानांनी घटनास्थळी जाऊन चायनीज शॉपमधील तीन सिलिंडर आगी धून बाहेर काढले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि शर्थीच्या प्रयत्नानंतर बाजूला असलेल्या सात ते आठ दुकानांना आगीपासून संरक्षण देण्यात यश आणि आगीवर नियंत्रण मिळवले त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

अग्निशामक केंद्रातील उपस्थानक अधिकारी विजय महाजन, फायरम संदीप शेळके, हितेश आहेर, राहुल शिरोळे, संदीप तांबे, प्रकाश मदने, सुरज इंगवले, अक्षय काळे, योगेश मायनाळे, वैभव कोरडे, विकास गायकवाड, मयूर गोसावी यांनी ही कामगिरी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button