breaking-newsपुणे

हिंजवडीत आयटी अभियंता तरुणीचा विनयभंग

पिंपरी – हिंजवडीतील एका आय टी कंपनीत कामाला निघालेल्या अभियंता तरुणीचा रस्त्याने जात असताना विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 10) रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी येथे घडला. याप्रकरणी 25 वर्षीय आय टी अभियंता तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी बुधवारी रात्री नऊच्या सुमारास कंपनीमध्ये कामासाठी जात होती. हिंजवडी पॉवर हाऊस जवळच्या कच्च्या रस्त्याने जात असताना मागून आलेल्या दुचाकीस्वाराने तरुणीची छेड काढत तिचा विनयभंग केला. या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने सरळ पोलीस ठाणे गाठले आणि अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात फिर्याद दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button