breaking-newsपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

हिंगोलीजवळ पोलिसांची गाडी जाळली

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा मोर्चाच्या वतीने मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. पुणे, अहमदनगर, नागपूर, औरंगाबाद अशा विविध ठिकाणी बंदचे पडसाद असून ठिकठिकाणी मराठा संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. जाळपोळ, तोडफोडीच्या घटना घडल्या असून परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मराठवाड्यात सकल मराठा मोर्चाच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनात सोमवारी काकासाहेब शिंदे (वय २८) या तरुणाने गंगापूर तालुक्यातील कायगाव टोक येथे पुलावरील गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारली. यात काकासाहेब शिंदे याचा मृत्यू झाला. त्यामुळे गंगापूर तालुक्यात तणावाचे वातावरण आहे. काकासाहेब शिंदेच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. रायगड, यवतमाळ, पुणे येथे दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button