breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हाॅटेलमध्ये वास्तव्यास असणा-या कोविड रुग्णांचा मृत्यू; पिंपरी महापालिका वैद्यकीय प्रशासन अनभिज्ञ

पिंपरी महाईन्यूज

वाकड येथील एका हॉटेलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या तरूणाचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. कोरोनाचा विळखा वाढत असताना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. शहर परिसरात वाढणाऱ्या रुग्णवाढीबाबत प्रशासन सजग नसल्याचे दिसून येत आहे. खासगी रुग्णालये, खासगी कोविड सेंटरवर महापालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. विठ्ठलवाडी सिंहगड रस्त्यावरील २७ वर्षीय तरूण हा वाकड, भूमकर चौकातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. तो २१ मार्चला तिथे आला होता. त्यानंतर तरूण गंभीर झाल्यानंतर त्यास २५ मार्चला रात्री सव्वा नऊला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी रात्री साडेदहा वाजता त्याचा मृत्यू झाला. २५ मार्चला मृत्यू झाला. कोविडमुळे त्या तरूणाचा मृत्यू झाला आहे, असे वैद्यकीय तपासणी अहवालात नमूद केले आहे.

कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती संकलित करत असताना हा रुग्ण वाकड मधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तसेच मृत्यू झालेल्या हॉटेलमध्ये असणारे सीसीसी सेंटरबाबत माहिती मागविली आहे.

याबाबत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, ‘‘ सध्या हॉटेलमध्ये कोणत्याही सीसीसी सेंटरला महापालिकेने परवानगी दिलेली नाही. वाकडच्या कोविड रुग्णाबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही. याविषयी योग्य ती तपासणी करण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button