breaking-newsराष्ट्रिय

हार्दिक यांची भेट घेण्यापासून समर्थकांनी मेधा पाटकरांना रोखले

अहमदाबाद – उपोषणाला बसलेले पाटीदार समाजाचे तरूण नेते हार्दिक पटेल यांच्या भेटीविनाच सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना परतावे लागले. पाटकर या शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत हार्दिक यांच्या समर्थकांनी त्यांना भेटीविनाच परत जाण्यास भाग पाडले.

पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक यांनी त्यांच्या येथील फार्महाऊसवर 25 ऑगस्टपासून सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आजचा आठवा दिवस होता. त्यांची भेट घेण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या पाटकर उपोषणस्थळी पोहचल्या. मात्र, हार्दिक यांच्या समर्थकांनी त्यांना रोखले. या घडामोडीबाबत हार्दिक यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या निमंत्रक गीता पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. पाटकर यांनी सातत्याने गुजरातविरोधी भूमिका घेतली. नर्मदा धरणाविरोधात त्यांनी आंदोलन छेडले. त्यामुळे अनेक वर्षे शेतकऱ्यांना धरणाचे पाणी मिळू शकले नाही. त्या कारणामुळे समितीच्या कार्यकर्त्यांनी पाटकर यांना हार्दिक यांना भेटण्यास विरोध केला, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, नंतर पत्रकारांशी बोलताना पाटकर यांनी आपण शेतकरीविरोधी नसल्याची भूमिका मांडली. नर्मदा धरणाचा मुद्दा आजही जनतेला व्यवस्थित समजलेला नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठीच आवाज उठवला. त्याची माहिती नसलेले मला विरोध करत आहेत. पुनर्वसनाचे पूर्ण पॅकेज न मिळालेले हजारों पाटीदार शेतकरी आमच्या लढ्यात सहभागी झाले, असे त्यांनी नमूद केले. हार्दिक यांच्याशी माझे कालच दूरध्वनीवरून बोलणे झाले. त्यांना मला भेटण्यात काहीच समस्या नव्हती, अशी पुस्तीही पाटकर यांनी जोडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button