हातावर पोट असणा-या असंघटीत कामगारांना आर्थिक सहाय्य द्या

पिंपरी – महाराष्ट्र राज्यात  मजुर, घरेलू कामगार,नाका कामगार, स्वच्छता कामगार,फेरीवाला,  रिक्षाचालक , बांधकाम कामगार , शेतमजुर,  विडी कामगार, कंत्राटी कामगार गटई कामगार यांचेसह हातावर पोट.असना-यांचा हातचा रोजगार गेला आसुन उपासमारिची वेळ आली आहे ,अशा स्थितीत जगायच कसे.असा प्रश्न निर्माण झाला  त्यांना कोरोना बंद  च्या काळात किमान समान  वेतन  स्त्री-पुरुष कामगाराना द्यावे अशी मागाणी कष्टकरी संघर्ष  महासंघ महाराष्ट्र ने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणी कामगार मंत्री दिलीप वळसे, बच्चु कडु यांचे कडे मागणी केली आहे. संपुर्ण जगभरात कोरोना -कोविड-19  हा  विषाणू संपुर्ण जगाला गिळ्ंकृत करु पहातोय. याचे रुग्ण देशभरात तीनशे पेक्षा अधिक आणी महाराष्ट्रात सत्तर  पेक्षा अधिक संख्या असल्याचे कळते. आपण मुख्यमंत्री या नात्याने योग्य दखल घेउन पुरेशी काळजी घेत आहात .सध्याचे संकट हे मोठे आहे. राज्यातील असंघटीत कामगार ही सहभागी होत  आहेत.महाराष्ट्र राज्यात  मजुर, घरेलू कामगार,नाका कामगार, स्वच्छता कामगार,फेरीवाला,  रिक्षाचालक , बांधकाम कामगार , शेतमजुर,  विडी कामगार, कंत्राटी कामगार गटई कामगार यांचेसह विविध घटकांचा असंघटीत कामगारात समावेश होतो याची संख्या.राज्यात मोठी आसुन आपल्याकडुंन सामाजिक सुरक्षा मिळावी म्हणून हे कामगार अपेक्षा करत आहेत.सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपण  मुंबई , पिंपरी चिंचवड, पुणे आणी नागपूर या चार महानगरातील खाजगी  आस्थापने, कारखाने आदी बंद ठेवण्याचा निर्णय घेउन कंत्राटी आणी तात्पुरत्या कामगारांच्या वेतन कापू नका आणी महात्वाचे म्हणजे कामावरून काढून टाकू नये  असे आवाहन  आपण केले आहे.  मात्र “कोरोना ” मुळे  राज्यातील असंघटीत कामगार यांचे हाताचे काम गेले आहे- जात आहे , यामुळे हातावर.पोट असणारे कामगारवर  दि.31 मार्च पर्यंत मोठे संकट ओढावले आहे. यात प्रामुख्याणे पुढील उदाहरणे देता येतिलयात  *घरकाम* करना-या महिला ( *मोलकरीण*) त्याना काम पाहिजे आहे मात्र अनेक घरमालकांचा त्यास विरोध असल्यामुळे  ते कामाला येऊ नका असे सांगतात यामुळे त्याना काम मिळत नाही परिणामी पगार ही मिळनार नाही बांधकाम कामगार शहरातील बांधकाम अस्थापानातील कामे बंद केली आसुन त्यांचे हातचे काम गेले आहे तसेच कामगार नाका जेथे सकाळी हे कामगार कामाची प्रतिक्षा करत आसतात तेथे ही बंद मुळे काम मिळत नाही , कामगार नाके सध्या ओस पडले आहेत. जर काम नाही तर खाणार काय अशी स्थिती झाली आहे. कंत्राटी कामगार यांच्या हातचे काम सध्या बंद  झाल्यामुळे  घरी बसुन कंत्राटदार पगार देत नाही आणी एकदा काम बन्द झाले की ते पुन्हा मिळनार की नाही याची शास्वती नाही,  बंद  च्या काळात उपजीविका कशी करणार हा प्रश्न आहे. फेरीवाला रस्त्यावरील विक्रेते हे नागरीकाना स्वस्त दरात विविध सेवा पुरवत असतात यात भाजीपाला, फळे, चहा ,नास्ता, चप्पल दुरुस्ती याचा समावेश होतो मात्र बंद  च्या काळात या रस्त्यावरील विक्रेत्यांचे व्यावसाय बंद झाल्यामुळे उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे . रिक्षाचलक या व्यायसायात जुने नविन असे अनेक  परवनाधारक रिक्षाचालक आहेत अनेक रिक्षावर कर्ज घेतलेली आहेत याचा हप्ता कसा फेड्नार आणी घर कसे चालवणार अशी स्थिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button