breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
हरिद लवादाचा महापालिकेने घेतला धसका; नदी पात्रांतील अतिक्रमणावर कारवाई सुरु
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड शहरातून वाहणा-या नदी पात्रात राडारोडा, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे काढण्यात येणार आहे. हरित लवादाच्या आदेशानूसार महापालिकेने कृति आराखडा तयार केला आहे. त्यामुळे सांगवी-पिंपळे गुरवच्या नदी पात्रातील अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला आहे.
सांगवी-पिंपळे गुरव परिसरातील प्रभाग क्रमांक 32 मधील पवना नदी पात्रालगत असलेल्या अनधिकृत तीन पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. त्यात 10 हजार 220 चाैरस फूट पत्राशेड पाडण्यात आले.
सदरील कारवाई प्रभारी शहर अभियंता राजन पाटील याचे मार्गदर्शनानूसार कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांच्यासह बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने केली.