breaking-newsताज्या घडामोडीपुणे

स्विकृत सदस्य निवडीत नवख्ये तुपाशी तर जूने उपाशी

पिंपरी- महापालिकेच्या आठ प्रभाग समितीवर स्विकृत सदस्य पदी सत्ताधारी भाजपच्या वतीने अनेक नवख्या कार्यकर्त्यांना संधी देवून जून्या कार्यकर्त्यांना केवळ छतरंजी उचलण्यापुरतेच ठेवले आहे का? असा प्रश्न भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे. पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात जून्या कार्यकर्यांची आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.  यामध्ये अजय पाताडे, संतोष तापकीर आदींचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व आहे. तसेच प्रभागात देखील त्यांनी विरोधकांना संधी मिळू नये, अशी प्रभागाची व्यूरचना केल्याने विरोधकांना कुठेही स्विकृत सदस्य पदावर संधी मिळालेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या आठही प्रभागावर सत्ताधारी भाजपचे स्विकृत सदस्य निवडून आले आहेत. महापालिकेच्या आठही प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्य पदासाठी निवडणूक लागली होती. त्या निवडणुकीत  24 जागेसाठी सुमारे 121 उमेदवार उभे राहिले होते. परंतू, त्या पदावर जून्या की नव्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची यावरुन बरेच खलबते सुरु झाले. तसेच पक्षाच्या कार्यकर्यांमध्ये प्रचंड खदखद व्यक्त होत आहे.

दरम्यान, महापालिकेच्या प्रभागातील स्विकृत सदस्य पदावरुन जून्या भाजप कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी प्रभाग समित्यांवर संधी देण्याची मागणी पक्षाच्या शहराध्यक्ष नेत्याकडे केली. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शहरातील कारभा-यांनी स्वीकृत सदस्यपदी जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच भाजपचे कार्यकर्ते पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात  आमरण उपोषणाला बसले आहेत.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button