breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वसंरक्षणासाठी मुलींना आता “प्रोजेक्ट निर्भया”चे प्रशिक्षण

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या पुढाकाराने वाकडच्या भूमकर चौक येथील आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळेत मुलींना स्वसंरक्षणाचे तंत्र व मंत्र देणा-या प्रोजेक्ट निर्भया हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन आज बुधवारी (दि. १७) महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे, राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे, नगरसेविका रेखा दर्शले, अश्विनी वाघमारे आदी उपस्थित होते.

या उपक्रमांबद्दल माहिती देताना शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे म्हणाल्या की, सामाजिक परिस्थितीत महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी ‘शाररिक आणि मानसिक’ सबलीकरणाची आवश्यकता आहे. त्याचे शिक्षण लहानपणापासूनच होणे आवश्यक आहे. नवरात्री मोह्त्सव साजरा करीत असताना आपण आपल्या आदिमातांकडून ही शिकवण व प्रेरणा घेणे आवश्यक आहे. हा विचार डोळयासमोर ठेऊनच याप्रसंगी आपण या प्रोजेक्टची सुरुवात करीत आहोत. सुरवातीला प्रथमदर्शी प्रकल्प हा ‘उर्मि’ या सामाजिक संस्थेद्वारा पालिकेच्या भूमकर व वाकड याठिकाणी शालेत सुरु करण्यात येत आहे. त्यानंतर याचा विस्थार सर्व कन्या शाळेत करण्यात येईल.

महापौर राहूल जाधव म्हणाले की,  C.S.R . च्या माध्यमातून सुरू झालेला हा प्रकल्प महिला सबलीकरणच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. पालिकेच्या वतीने अशा प्रकल्पाला पूर्ण सहकार्य केले जाईल. त्याचा लाभ अधिकाधिक मुलींपर्यत कसा पोहचवता येईल, याचा सर्वानी मिळून विचार केला पाहिजे. त्याचबरोबर महिलांसाठीचे सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आपले सर्वांचे कर्त्तव्य आहे. प्रशासनाच्या वतीने या प्रकल्पाच्या अमलबजावणीस पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button