breaking-newsपुणे

स्वर्गीय लोकनेते प्रमोद महाजन पुण्यतिथीनिमित्त भाजपातर्फे अभिवादन

 

पिंपरी  भारतीय जनता पार्टीच्या वतीने खराळवाडी पक्ष कार्यालयात स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या 12 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते लोकनेते प्रमोद महाजन यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. 

यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार शहर प्रवक्ते अमोल थोरात, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके. शितल शिंदे, प्रियांका बारसे, प्रमोद निसळ, चेतन घुले, राजू सावंत, प्रदिप बेंद्रे, नंदू भोगले, संजीवनी पांडे, सुरेश वाडकर, रामकृष्ण राणे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button