breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

स्वत:ची पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर करणं हा अहंकार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोलार: काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत:लाच पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ‘पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडे दुर्लक्ष करून आणि आघाडीतील मित्रपक्षांना विश्वासात न घेता एखादा नेता स्वत:ला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून कसा काय घोषित करू शकतो? राहुल गांधी यांची ही घोषणा म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून हा त्यांचा अहंकार आहे, असा हल्लाबोल मोदींनी केला.

बंगारपेट येथील एका प्रचार सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या पंतप्रधानपदाच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ‘राहुल यांचे वक्तव्य म्हणजे हा त्यांचा अहंकार आहे. स्वत:च स्वत:ला कोणी कसे काय पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करू शकतो. मोदींना हटवण्यासाठी दिग्गजांचे पाय पकडले जात आहेत. या दिग्गजांसोबत बैठका सुरू आहेत. तरीही त्यांना अंधारात ठेवून स्वत:ला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. हा आघाडीवरील अविश्वासच नाही का? आघाडीतील नेत्यांवर अविश्वास ठेवणाऱ्या या नेत्याला देशातील जनता तरी स्वीकारेल का?,’ असे सवाल करतानाच ‘त्यांचे हे वक्तव्य म्हणजे काँग्रेसमधील अंतर्गत लोकशाहीची पोलखोलच आहे,’ असा टोला मोदी यांनी लगावला. तसेच राहुल म्हणजे रिकाम्या बादलीवाला दबंग आहे, अशी बोचरी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button