breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘स्मार्ट सिटी’ संचालकांचा स्पेन दाैरा ; वीस लाखाची होणार उधळपट्टी

बर्सिलोना येथे ‘स्मार्ट सिटी एक्सपो वर्ड काॅंग्रेस-2018’ परिषद

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  अभ्यास व प्रशिक्षणाच्या नावाखाली पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक मंडळ व अधिकारी वर्ग स्पेनमधील बर्सिलोना येथील जागतिक परिषदेला जाणार आहेत. सात दिवसाच्या या दाैरावर तब्बल 20 लाखाची उधळपट्टी करण्यात येणार आहे. सत्ताधारी भाजपासह राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेचे पदाधिकारी  या दाै-यात सहभागी होणार आहे. या विषयाला स्थायी समितीच्या आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीत एेनवेळी मान्यता देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या.  

स्पेनमधील बर्सिलोना येथे ‘स्मार्ट सिटी एक्सपो वर्ड काॅंग्रेस-2018’ जागतिक परिषद 13 ते 15 नोव्हेंबरला आयोजित केली आहे. या परिषदेला पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक असलेले महापाैर राहूल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे प्रमोद कुटे, मनसेचे सचिन चिखले यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण आणि राजन पाटील हे 11 ते 17 नोव्हेंबर दरम्यान सात दिवसाच्या दाै-यावर जाणार आहे. 

पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. जगातील शहराच्या विकासांसाठी भविष्यकालीन दृष्टीकोन, ध्येय ठरवून शहरे विकास करणे व राहण्यायोग्य बनविणे आवश्यक आहे. याकरिता 400 तज्ञ चर्चासत्रे, परिसंवादाच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. शहरी समस्या व उपाययोजना यांच्यावर एकत्रित चर्चा करण्यासाठी जागतिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

मे. व्हीजन हाॅलिडेज, प्राधिकरण निगडी यांचेकडून दाै-याचे नियोजन केले आहे. पॅकेज टूर स्वरुपात स्मार्ट सिटीचे संचालक व अधिकारी यांचा व्हीसा, विमानप्रवास, निवास, चहा, नाश्ता, भोजन, स्थानिक प्रवास, विमा व इतर सर्व खर्चासह 20 लाख 21 हजार 250 इतक्या खर्चाचे कोटेशन सादर केले आहे.   

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button