breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्मार्ट सिटी कंपनीसाठी १७ अभियांत्रिकी पदांची लवकरच भरती

  • दोन वर्षासाठी १७ अभियांत्रिकी पदांची लवकरच भरती
  • एका वर्षास सुमारे 90 लाख रुपये खर्च अपेक्षित

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीकडून  शहरातील विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्या कामासाठी १७ अभियांत्रिकी पदे नियुक्त करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यांची नियुक्ती दोन वर्षासाठी करुन सुमारे 90 लाख रुपये एका वर्षाचा खर्च अपेक्षित आहे. त्यास आज (शुक्रवार) झालेल्या स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड संचालक मंडळाची आठवी बैठक आज (शुक्रवार) महानगरपालिका आयुक्त कक्षात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, केंद्र शासन प्रतिनिधी ममता बात्रा, महापाैर राहूल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते दत्ता साने, संचालक प्रमोद कुटे, सचिन चिखले, पोलिस आयुक्त आर.के.पद्यनाभन, पीएमपी व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, विभागीय आयुक्त पी.एस.खांडकेकर, आयुक्त तथा सीईओ श्रावण हर्डिकर, निळकंठ पोमण, राजन पाटील, लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे आदी उपस्थित होते.

स्मार्ट सिटी अंतर्गत एरिया बेस डेव्हलपमेंट भागातील कामासाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. स्मार्ट सिटीच्या मनुष्यबळ विकास धोरणानुसार १७ अभियांत्रिकी पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी वार्षिक ९० लाख खर्च अपेक्षित आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पावरील खर्चासाठी अधिका-यांना प्रशासकीय व वित्तीय अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button