breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायी समिती सभापती निवड शनिवारी निश्चित?

  • 2 मार्चला दुपारी 3 ते 5 यावेळेत अर्ज स्विकारणार 
  • 7 मार्चला दुपारी 12 वाजता स्थायी समिती सभापती निवड  

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांची मुदत 28 फेब्रुवारी संपणार आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापती पदाची निवड 7 मार्चला दुपारी 12 वाजता माजी महापाैर मधुकर पवळे सभागृहात घेण्यात आली आहे. या निवडीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी नेमणूक करण्यात आली आहे. 

मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 2007 आणि 2008 नूसार मध्ये स्थायी समिती सभापती निवड घेण्यात येते. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्थायी समिती सभापती निवड यासंर्दभात कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केलेला होता. त्यानूसार स्थायी समिती सभापती  पदाच्या निवडणुकीसाठी 7 मार्च 2019 रोजी निश्चित केली आहे. तसेच या स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी 2 मार्च रोजी नगरसचिव कार्यालयात दुपारी 3 ते 5 यावेळेत अर्ज स्विकारण्यात येणार आहे. त्यानंतर स्थायी समिती सभापती निवड ही 7 मार्चला दुपारी 12 वाजता घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांचे विशेष प्रतिनिधी म्हणून निवडणुक अधिकारी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी नेमणूक करण्यात आली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button