breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

स्थायी समिती सभापतीपदासाठी ज्येष्ठ नगरसेविका झामाबाई बारणे यांचे नाव आघाडीवर?

  • थेरगावात वर्चस्व वाढविण्यासाठी आमदार जगताप यांची मोर्चेबांधणी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेची तिजोरी असलेल्या स्थायी समितीच्या सभापतीपदावर सलग तिसऱ्यांदा ‘महिलाराज’ पहायला मिळणार आहे. स्थायी समितीच्या सभापतीपदावर ज्येष्ठ  आणि अपक्ष नगरसेविका झामाबाई बारणे यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून, भाजपच्या गोटामध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे सावट स्थायी समिती आणि महापालिकेतील महत्त्वाच्या पदांच्या निवडीवर दिसणार आहेत.  झामाबाई बारणे या अपक्ष नगरसेविका असल्या तरी त्या भाजपशी सलग्न आहेत. त्यामुळे त्यांना स्थायीच्या सभापती पदावर संधी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. झामाबाई यांच्या माध्यमातून खासदार बारणे यांना आव्हान मिळावे आणि थेरगावातील आपले वर्चस्व वाढावे, यासाठी भाजप शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप आग्रही आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांची मुदत आज (दि. २८) संपली आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापतीपदाची निवड ७ मार्चला दुपारी १२ वाजता महापालिकेतील माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात होणार आहे. अर्ज भरण्यासाठी २ मार्च रोजी दुपारी ३ ते ५ यावेळेत मुदत देण्यात आली आहे. ही औपचारिक पध्दत आमलात आणली जात असली तरी सभापतीपदासाठी अपक्ष नगरसेविका झामाबाई बारणे यांचे नाव निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, चिंचवडमधून आमदार जगताप आणि निष्ठावंत भाजप गटाचे नगरसेवक शितल उर्फ विजय शिंदे आणि भोसरी विधानसभेतून आमदार लांडगे गटाचे संतोष लोंढे या दोघांनीही आपआपल्या परीने पक्षश्रेष्ठींकडे ‘फिल्डिंग’ लावली आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापतीपदाची चांगलीच चुरस होईल, असे दिसत आहे.

सावळे, गायकवाड आणि आता बारणे…

सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात स्थायी समिती सभापती पदावर महिला राज कायम राहिले आहे. भाजपच्या काळातील पहिल्या वर्षात स्थायी समिती सभापती पदावर एक मागासवर्गीय चेहरा म्हणून सीमा सावळे यांना संधी मिळाली. त्यानंतर पुन्हा मागासवर्गीय प्रवर्गातील माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पत्नी नगरसेविका ममता गायकवाड यांना संधी दिली. आता पुढील वर्षात देखील महिलाच या पदावर राज्य करणार असे संकेत आहेत.

झामाबाई बारणे यांची राजकीय वाटचाल…

झामाबाई बारणे यांची महापालिका निवडणुकीची ही चौथी टर्म आहे. महापालिकेत त्या सर्वात ज्येष्ठ नगरसेविका आहेत. २०१७ च्या निवडणुकीत त्यांना कोणत्याही पक्षाची उमेदवारी मिळाला नाही. तरी, त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. थेरगाव परिसरासह शहराची सखोल माहिती आणि जनमानसात त्यांची लोकप्रिय छबी एक कार्यकुशल नगरसेविका म्हणून म्हणून आहे. त्यामुळे त्यांना सभापतीपद देऊन आमदार जगताप हे या भागातील खासदार श्रीरंग बारणे यांची कोंडी करणार आहेत. स्थायी समितीच्या सभापतीपदावरुन स्थानिक आणि बाहेरचा असा वाद अनेकदा उफाळून आला होता. त्यामुळे आमदार जगताप यांच्या भूमिकेवर काही स्थानिक नगरसेवकांनी नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने झामाबाई बारणे यांच्या माध्यमातून थेरगावातून आणि स्थानिक नगरसेवकाला स्थायी समितीवर संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असावा, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button