breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायीची शेवटची सभा पोलीस बंदोबस्तात, रात्री उशीरापर्यंत चालणा-या सभेचे गुपीत काय ?

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेची चालू वर्षातील स्थायी समितीची शेवटची सभा आज होत आहे. शेवटच्या सभेत सत्ताधा-यांकडून अनेकांना खूश केले जाणार असून त्यातून टक्केवारीची गणिते जुळविली जात असल्याचा अंदाज आहे. शेवटच्या सभेत कोणाचा व्यत्यय येऊ नये, यासाठी पालिकेच्या तिस-या मजल्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

स्थायी समितीच्या सभेत शहरातील विकास कामांना लागणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च मंजूर केला जातो. कामात टक्केवारी लाटण्यासाठी मर्जीतील ठेकेदारांना पायघड्या घालून निविदा भरून घेतल्या जातात. मंजूर खर्चातून विशेष टक्के रक्कम देण्याचा शब्द ठेकेदाराकडून घेतला जातो. सत्ताधा-यांबरोबर विरोधकही मालामाल होण्याची स्वप्ने पाहतात. त्यामुळेच बहुतांश विषयांना विरोध होत नाही. झालाच तर तो वाटाघाटीने मिटवून घेतला जातो. आज सत्ताधारी पक्षातील एका गटाची शेवटची सभा असल्याने ही शेवटची संधी चांगलीच गाजणार आहे. त्यामुळेच आज स्थायी समिती सभेला उशिरा सुरूवात करण्यात आली आहे.

रात्री उशिरापर्यंत सभा चालविण्याचा सत्ताधा-यांचा विचार दिसतो. शेवटची सभा असल्याने वादग्रस्त, न्यायप्रविष्ठ, तडजोडीचे सर्व विषय आर्थिक तोडगा काढून मार्गी लावले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ठेकेदारांचा पालिकेच्या तिस-या मजल्यावर गराडा पडला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button