breaking-newsआंतरराष्टीयपुणेमहाराष्ट्र

‘स्टार्ट अप’साठी भारत, इस्रायलचे संयुक्त प्रयत्न’

भारत आणि इस्रायल ही दोन्ही स्टार्टअप राष्ट्र आहेत. तरुणांमधील कल्पकता आणि नावीन्यपूर्ण विचार यांचा योग्य वापर करुन भारत आणि इस्रायलला स्टार्टअप क्षेत्रात संयुक्तरीत्या प्रकल्प हाती घेता येतील. हा उपक्रम दोन्ही देशांसाठी उपयुक्त ठरणारा असून त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचा दोन्ही देशांना फायदा होईल, असा विश्वास इस्रायलचे भारतातील राजदूत डॉ. रॉन माल्का यांनी बुधवारी व्यक्त केला.

‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’तर्फे (पीआयसी) आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि उद्योजक रवि पंडित यांच्या ‘लीपफ्रॉगिंग टू पोलव्होल्टिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. रॉन माल्का आणि सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. माल्का बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया, पीआयसीच्या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष प्रो. अमिताव मलिक, पीआयसीचे मानद संचालक प्रशांत गिरबाने या वेळी उपस्थित होते.

‘लीपफ्रॉगिंग टू पोलव्होल्टिंग’ या पुस्तकात डॉ. माशेलकर आणि रवि पंडित यांनी क्लिष्ट जागतिक प्रश्नांवर भाष्य करत ते सोपे करून त्यावर उपाय सुचविण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकाबाबत बोलताना डॉ. माशेलकर म्हणाले,‘ ‘पोलव्होल्टिंग’ या खेळात शून्यातून सुरुवात करून उंच उडी घ्यायची असते. अनपेक्षित परिणाम असलेली धोरणे, राजकीय नेतृत्व, समाजाची मानसिकता असे विविध अडथळे यात येऊ  शकतात. अशा वेळी उत्तुंग महत्त्वाकांक्षा, कल्पकता आणि अभ्यासाच्या जोरावर ध्येय साध्य करता येते.’

सार्वजनिक धोरणात काय करावे आणि काय टाळावे याबद्दल या पुस्तकात एक प्रकरण समाविष्ट करण्यात आल्याचे रवि पंडित यांनी सांगितले. कल्पनांचा सुयोग्य वापर करत जग अधिक चांगले कसे करता येईल याबाबत हे पुस्तक महत्त्वाचे असल्याचे अरुण फिरोदिया म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button