breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

‘सोशल मीडिया’वर आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा

  • लाडक्या आयुक्तांना भाजपच्या पदाधिका-यांकडून हार्दीक शुभेच्छा
  • आयुक्त-पदाधिकारी यांच्यातील स्नेहाचे कौतुक करावे तेवढे थोडेच

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा वाढदिवस सोशल मीडियावर धडाक्यात साजरा झाला आहे. शहरातील सत्ताधारी भाजपच्या आमदारांसह महापौर, उपमहापौर, स्थायी समितीच्या माजी सभापती, पक्षनेते, नगरसेवक आदींनी सोशल माध्यमातून हर्डीकरांवर शुभेच्छांचा वर्षावर केला आहे. वाढदिवसानिमित्त भाजप पदाधिका-यांनी लाडक्या आयुक्तांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. एक भा.प्र.से. अधिकारी असूनही आयुक्तांनी भाजपतील पदाधिका-यांशी जे स्नेहाचे नाते जोपासले आहे, ते कौतुक करण्याच्या पलिकडचे आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा आज जन्मदिवस आहे. जन्मदिवसाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड भाजपतील काही पदाधिका-यांनी हर्डीकरांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांचा फोटो पोस्ट करून जबरदस्त सेलिब्रेशन केले आहे. त्यामुळे आयुक्त आणि भाजप पदाधिकारी यांच्यातील ऋणानुबंद किती घट्ट आहेत, याचे दर्शन सर्वांनाच झाले आहे. परंतु, एखाद्या प्रशासकीय अधिका-याचा वाढदिवस अशा पध्दतीने साजरा होत असताना प्रथमच पाहायला मिळतो आहे. एरव्ही, किरकोळ मुद्यांवरून आयुक्तांवर तोंडसुख घेणा-यांचा सुध्दा शुभेच्छुकांच्या मांदियाळीत सहभाग आहे. भाजपची सत्ता असताना पिंपरी-चिंचवडमध्ये अचानक एवढे परिवर्तन कसे काय घडले, याचा विचार करावा तेवढा थोडा आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर सुरूवातीला प्रचंड आरोप झाले. नागरिकांच्या प्रश्नांवरून माजी विरोधी पक्षनेते स्व. दत्ता साने यांनी तर आयुक्तांना ना-ना प्रकारच्या उपाध्या दिल्या होत्या. भाजप आणि आयुक्त यांच्यातील किती स्वच्छ नातं आहे, याचा सविस्तर आढावा दत्ताकाकांनी घेतला होता. आजच्या वाढदिवसानिमित्त सुध्दा काकांनी विशेष भेटवस्तू देऊन आयुक्तांना अनोख्या शुभेच्छा दिल्या असत्या. एवढेच नव्हे तर, भाजप आणि आयुक्त यांच्यातील पारदर्शक नातेसंबंधाचा बुरखा फाडून खरे चित्र जनतेसमोर स्पष्ट करून दाखविले असते. परंतु, आज काका हयात नाहीत, हे पिंपरी-चिंचवडकरांचे दुर्दैव मानावे लागेल, अशा भावना काकांना माणणा-या व्यक्तींनी व्यतिथ केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button