breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
सोशल डिस्टंसिंगसाठी मुंबई पोलिसांची नवीन घोषणा, दुकानदारांना ग्राहकांना द्यावे लागणार टोकन
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात सद्य स्थितीत कोरोना बाधितांची संख्या जवळपास 12,974 पोहोचली असून मुंबईत 9123 रुग्ण आढळले आहेत. ही संख्या लक्षात घेता मुंबईत सोशल डिस्टंसिंगसाठी मुंबई पोलिसांनी आता नवीन घोषणा केली आहे.
या घोषणेनुसार मुंबईतील दुकानदारांना ग्राहकांना टोकन द्यावे लागणार आहे. दुकानांबाहेरील गर्दी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी हा नवा नियम लागू केला आहे. यामुळे दुकानांबाहेर होणारी गर्दी टाळता येण शक्य होणार आहे…तसेच ट्विट करत मुंबई पोलिसांनी माहिती देखील दिली आहे…