breaking-newsमहाराष्ट्र

सोलापूर जिल्हा बँक संचालक मंडळ बरखास्त; आरबीआयच्या शिफारशीनंतर सरकारची कारवाई

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या शिफारसीनंतर सरकारने कारवाई करत संचालक मंडळ बरखास्त केले आहे. सहकार खात्याच्या कलम 110 अ अन्वये ही कारवाई करण्यात आली असून सोलापूरचे उपनिबंधक अविनाश देशमुख यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज सकाळी 11 वाजता बँकेचा पदभार स्विकारला.

मागील काही बर्षांपूर्वी बँकेच्या तत्कालीन सभापतीसह संचालकांनी तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्जवाटप केले. त्यामुळे नाबार्डने यापूर्वीच बँकेला कारभार सुधारुन थकबाकी वसूल करण्याचे निर्देश दिले होते. परंतू थकबाकी जैसे थे राहिली. मोठ- मोठया नेतेमंडळीच्या कारखाना व संस्थाकडे सुमारे ६५० कोटींची  थकबाकी आहे. त्यामुळे बँकेचा एनपीए वाढला. त्याचा अहवालही यापूर्वी तयार करण्यात आला आहे. या वर्षीच्या ताळेबंदात सुमारे ३४२ कोटींची एनपीएची तरतूद करण्यात आहे.

बँकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने बँकेचे कर्जवाटप ठप्प झाली आहे. बँकेची एनपीए वाढ व थकबाकी वसुली नाही आणि तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्जवाटप यासह अन्य कारणांमुळे कलम ११० अंतर्गत बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. बँकेच्या प्रशासक पदाथा चार्ज शहर उपनिबंधक कुंदन भोळे यांच्याकडे सोपविला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button