breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सोलापुरात प्रकाश आंबेडकर-सुशीलकुमारांची भेट, राजकीय चर्चेला उधाण

सोलापूर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाती उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच बाकी असताना झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणा आलं आहे.

शिवराज पाटील चाकुरकर यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर सुशीलकुमार शिंदे हे प्रकाश आंबेडकर यांना भेटले आहेत, असं स्पष्टीकरण काँग्रेसने दिलं आहे. दोन दिवसांपूर्वीच झालेल्या सभेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शिंदेंवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर झालेल्या या भेटीने शहरात राजकीय चर्चा रंगत आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला. पण मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे शरद बनसोडे हे जाएंट किलर ठरले. त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

सोलापुरातील यंदाची निवडणूक तिरंगी होणार आहे. कारण काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर स्वामी मैदानात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button