breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचा-यांचा महापालिकेतर्फे सन्मान

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांनी निवृत्तीनंतर आपले राहून गेलेले आवडीचे समाजसेवेचे व्रत जोपासावे, असे मत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतून एप्रिल २०१९ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या १७ अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतीचिन्ह, सेवा उपदान व अंशराशीकृत धनादेश सुपूर्द करुन सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, सहशहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता देवान्ना गट्टुवार, संजय कुलकर्णी, प्रदिप पुजारी, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये शहर अभियंता अंबादास चव्हाण, कार्यकारी अभियंता दिपक सुपेकर, मुख्य लिपीक संभाजी स्वामी, सतीश औटी, उपलेखापाल शंकर चव्हाण, उदयान सहाय्यक दिलीप सटाले, सहाय्यक शिक्षक सुधीर कुलकर्णी, हेमा वैशंपायन, उपशिक्षक रत्नमाला जगताप, मृणालिनी कुलकर्णी, वाहन चालक श्रीरंग काळोखे, विठठल देवकर, मुकादम किरणपाल सौदा, फायरमन गोरखनाथ घाडगे, रखवालदार ज्ञानेश्वर शिंदे, शिपाई रमेश आवाळे, आरोग्य कर्मचारी सिंधूबाई शिंदे यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button