breaking-newsराष्ट्रिय

सेक्स सीडी प्रकरण – छत्तीसगड काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची तुरुंगात रवानगी

बनावट सेक्स सीडी प्रकरणी छत्तीसगडचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भुपेश बाघेल यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सोमवारी रायपूरमधील सीबीआय विशेष न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आता याप्रकरणी 8 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे. वर्षाअखेर चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे, ज्यामध्ये छत्तीसगडचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत बाघेल यांची अटक काँग्रेससाठी मोठा झटका असल्याचं म्हटलं जात आहे.

भुपेश बाघेल यांच्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री राजेश मुनत यांची बनावट सेक्स सीडी वाटप केल्याचा आरोप आहे. बाघेल यांच्यावर लावण्यात आलेले आरोप जामीनपात्र आहेत. मात्र त्यांनी आपण जामीनासाठी अर्ज करणार नसून कारागृहात सत्याग्रह करणात असल्याचं सांगितलं आहे. बाघेल यांनी न्यायालयात आपण निर्दोष असून हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला.

बाघेल यांच्या अटकेविरोधात विरोधी पक्षाने मंगळवारी जेलभरो आंदोलन पुकारलं आहे. चार्जशीटमध्ये बाघेल यांच्या नावाचा उल्लेख झाल्यानंतर भाजपाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षातून त्यांनी निलंबत करावं अशी मागणी केली आहे.

न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर बाघेल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, ‘भाजपा सरकारने जेव्हा बिलासपूरमध्ये कार्यकर्त्यांवर हल्ला केला, तेव्हाच आपले रंग दाखवले. हे राजकीय प्रकरण असून, लोक अंतिम निर्णय घेतील’. दरम्यान मुख्यमंत्री रमण सिंह यांनी याच्याशी सरकारचं काही देणं घेणं नसल्याचं म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button